Pushpa 2(पुष्पा 2) की Singham Again (सिंघम अगेन) कोण मारणार बाजी?
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन चा Pushpa 2 the rule आणि बॉलीवूड अभिनेता अजय देवगन चा सिंघम Again हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी (15 ऑगस्ट 2024) रिलिज होणार आहेत.
Pushpa 1 The rise च्या यशानंतर Allu Arjun लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे.
या चित्रपटानंतर allu arjun चा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे .
त्याच्या येणाऱ्या आगामी चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
या चित्रपटात allu Arjun सोबत Rashmika mandhana व Fahadh Faasil हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.
बॉक्स ऑफिस वर ₹342 कोटींची कमाई करून 2021 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून उदयास आला होता.
Pushpa 2 The Rule ( पुष्पा 2 द रूल) .
हा चित्रपट पहिल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे.
लेखन व दिग्दर्शन – सुकुमार
मुख्य कलाकार – allu Arjun (अल्लु अर्जुन), Rashmika mandhana ( रश्मीका मंधाना), व
Fahadh Fassil (फहाद फाजिल) हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा 2’चा समावेश असणार आहे
Singham
हा चित्रपट तमिळ भाषेतील चित्रपटाचा रिमेक आहे.22 जुलै 2011 ला जगभरातील 1500 स्क्रीन वर हा चित्रपट झळकला होता.
रोहित शेट्टी ने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात ajay devgan (अजय देवगन) आणि kajal agrawal (Kajal Agarwal ) यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ताबडतोड कमाई करत अक्षरशः धुमाकूळ घातला होता.
चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असून सुद्धा प्रकाश राज यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते . यानंतर SinghamReturns (2014),Simmba (2018) Sooryavanshi (2021) हे चित्रपट पडद्यावर झळकले व प्रेक्षकांनी यांनाही भरभरून प्रतिसाद दिला.
अजय देवगन ने या चित्रपटाच्या नंतर तानाजी, दृश्यंम, शैतान , भोला इत्यादी चित्रपटात काम केले.
या चित्रपटांनी व्यावसायिक दृष्ट्या बऱ्यापैकी कमाई केली.
आता 15 ऑगस्ट 2024 ला Singham Again हा चित्रपट सिनेमा घरात झळकणार आहे. आणी याच दिवशी लोकप्रिय चित्रपट Pushpa चा sequal Pushpa 2 रिलीज होत आहे.
दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज करणे हे दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांना परवडणारे नाही कारण यामुळे चित्रपटाच्या कमाईमध्ये फरक पडू शकतो.त्यामुळे साहजिकच दोन्हीपैकी कुठलातरी चित्रपट 15 तारखेच्या नंतर रिलीज होणार याची दाट शक्यता आहे.
हे पण वाचा –