Gautam Buddha /Buddha Purnima 2024
Gautam Buddha : –
जन्म :- इ. स. पूर्व 563 (कोशल महाजनपदातील शाक्य राज्यात)
• ठिकाण – लूंबिनी
वडील – राजा शुध्दोध (शाक्य राज्याचे राजे होते)
• आई – महामाया /मायादेवी
पत्नी – यशोधरा (विवाह इ. स. पूर्व 547 मध्ये झाला)
मुलगा – राहुल
• सिद्धार्थच्या जन्मानंतर लवकरच त्यांची आई महामाया यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांची मावशी गौतमी यांनी केल्याने सिद्धार्थला गौतम असेही म्हणतात.
बौद्ध धर्माची स्थापना ही इ.स.पु. 6 व्या शतकात Gautam Buddha यांनी केली.
भगवान बुद्धांच्या महापारीनिर्वाणानंतर पुढील दोन शतक सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. आणि नंतर पुढील 2000 वर्षांमध्ये हा धर्म पूर्ण जगभर पसरला.
बौद्ध धर्म हा आपल्या उगमस्थानापासून बाहेर पडून जगभर पसरणारा पहिला धर्म आहे.
• बौद्ध धर्म हा बंधुत्व, समता, प्रेम, समानता, करुणा, स्वातंत्र्य, प्रज्ञा, मानवीय मुल्ये, विज्ञान या सर्व तत्वांना महत्व देऊन पुढे येणारा धर्म आहे.
महाभिनिष्क्रमण– दुःखाचे मूळ कारण काय आहे याचा शोध घेण्यासाठी सिद्धार्थने वयाच्या 29 व्या वर्षी गृहत्याग केला या घटनेस महाभिनिष्क्रमण किंवा अनुमा असे म्हणतात.
• पुढे सात वर्षे भटकंती करून वेगवेगळ्या तपश्चर्या केल्या आणि इ. स. पूर्व 528 मध्ये वयाच्या 35 व्या वर्षी निरंजना नदीच्या काठावर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करत असताना त्यांना वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी गया येथे त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’
असेही म्हणतात. • हे झाड पुढे ‘बोधीवृक्ष‘ नावाने ओळखले जाऊ लागले आणि ते ठिकाण बिहारमध्ये बोधगया म्हणून ओळखले जाऊ लागले.
धर्मचक्रप्रवर्तन :-
सारनाथ येथे बुद्धांनी वाराणसीजवळ आपला पहिला उपदेश दिला या घटनेस धर्मचक्रप्रवर्तन म्हणतात.
धम्म प्रचारासाठी जवळपास 45 वर्षे त्यांनी चारिका (पायी फिरणे) केली.
धम्म म्हणजे धर्म होय.
• धम्म च्या प्रसारासाठी त्यांनी संघ ची स्थापना केली.
संघात सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश असे. संघात समानता होती. स्त्री ला सुद्धा संघात स्थान देण्यात आले.
बौद्ध धर्माचा स्वीकार करणारी व संघात स्थान मिळणारी पहिली महिला बुद्धांची मावशी गौतमी होत्या.
बौद्ध धर्माची शिकवण आणि सिध्दांत:-
• भगवान गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना सांसारिक कठोर परित्याग आणि संन्यास या दोन टोकाच्या गोष्टी टाळण्यास सांगितले.
• बुद्धानी मध्यम मार्गाचा अवलंब करावा असे प्रतिपादन केले. बुद्धाच्या मते, प्रत्येकजण आपल्या जीवनातील आनंदासाठी जबाबदार होता.
आर्यसत्येः–
1) दुःख :- जीवन दुःखाने भरलेले आहे.
2) तृष्णा :- इच्छा हे सर्व दुःखाचे मूळ कारण आहे.
3) दुःख निरोध :- इच्छेवर विजय मिळवून दुःखावर विजय मिळवता येतो.
4) प्रतिपदः अष्टांग मार्गाचा अवलंब करून इच्छांवर विजय मिळवता येतो.
अष्टंग मार्ग :-
• मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला.
1) सम्यक दृष्टी – निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
2) सम्यक संकल्प – योग्य निर्धार व विचार.
3) सम्यक वाचा – खोटे न बोलणे, चाहाडी, कठोर, किंवा निरर्थक बडबड न करणे. करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
4) सम्यक कर्म – उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
5) सम्यक आजीविका – वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
6) सम्यक व्यायाम – वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
7) सम्यक स्मृती – तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
8) सम्यक समाधी – कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे. आपले मन शांत आणि एकाग्र करून घ्यान करणे आणि ध्यानाचा अनुभव घेणे.
पंचशील तत्वे :-
1) सत्य
2) अहिंसा
3) अस्तेय ( चोरी न करणे)
4) ब्रह्मचर्य
5) मादक द्रव्य विरति (व्यसनापासून लांब राहणे)
साहित्य व ग्रंथसंपदा :-
बौद्ध धर्मातील महत्वाचे ग्रंथ त्रिपीठक (भाषा पाली)
1) सुत्तपीठिक – यात बुद्धांचे आपल्या शिष्यांशी केलेले संवाद आहेत.
2) विनयपीठक – बौद्ध भिक्शुंसाठी संघात आचरणाचे नियम यात आहेत.
3) अभिधम्मपीठिक – यात बौद्ध तत्त्वज्ञानाचा उल्लेख आहे
दीपवंश आणि महावंश – अशोकाच्या आदेशावरून श्रीलंकेत निर्मिती केली गेली आहे. यात अशोकाने सत्ता मिळवण्यासाठी आपल्या 99 भावांचा वध केल्याचा उल्लेख आहे.
मिलिंदपन्हो = हा बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ असून त्याची निर्मिती सुमारे इ.स.पू. 100 मध्ये झाली आहे. या ग्रंथात बौद्ध भिक्खू नागसेन आणि भारतीय ग्रीक सम्राट मिलिंद यांच्यातील वादविवादात्मक चर्चा आहे. मिलिंदांनी विचारलेल्या बौद्ध धर्माविषयीच्या व इतरही सर्व प्रश्नांचे नागसेन यांनी अगदी समर्पक उत्तरे दिली त्यात मिलिंदाचे समाधान झाले आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
बुद्धचरित – लेखक अश्वघोष गौतम बुद्धांच्या संपूर्ण जीवनचरित्र यात आहे. याची रचना दुसऱ्या शतकात झाली. काव्याच्या 28 कॅन्टोजांपैकी पहिले 14 संस्कृतमध्ये पूर्णावस्थेत अस्तित्वात आहेत (15 ते 28 अपूर्ण अपूर्ण आहेत). इ.स. 420 मध्ये धर्मरक्षा यांनी याचे चिनी भाषांतर केले होते.
निधन –
इ.स.पूर्व 483 मध्ये उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना महापरिनिर्वाण म्हणून ओळखली जाते. आज त्या ठिकाणी रामाभर स्तूप आहे.
वर्धमान महावीर, राजे प्रसेनजीत, बिंबिसार आणि अजातशत्रु हे गौतम बुद्धाचे महत्त्वाचे समकालीन होते.