मुकेश अंबानी करणार AI तंत्रज्ञान व्यवसायात पदार्पण

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

आता Mukesh Ambani करणार AI Technology व्यवसायात पदार्पण. BharatGPT VS ChatGPT

Mukesh Ambani
Mukesh Ambani Image Source :- Reliance official website

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Mukesh Ambani कुठलाही व्यवसाय सुरू करताना ते नेहमीच पुढचा विचार करतात. त्यांची विचार करण्याची पद्धत ही नेहमीच इतरांपेक्षा वेगळी राहिलेली आहे.

Jio
Jio

याचच एक उदाहरण म्हणजे जिओ. जिओ लॉन्च करताना मोटाभाईंनी जी स्ट्रॅटेजी वापरली होती तिचं आज पण सर्वजण कौतुक करतात. त्यांच्या या मोफत रिचार्ज स्ट्रॅटेजी मुळे भारतातील बहुसंख्य उपभोक्ता त्यांच्याकडे आकर्षित झाला. कित्येक मोबाईल नेटवर्क ऑपरेटर कंपन्या बाजारातून नाहीशा झाल्या व आज Reliance Jio ही भारतातील दिग्गज मोबाईल नेटवर्क ऑपरेटिंग कंपनी आहे. आठ वर्षातच Reliance Jio जगातली तिसरी सर्वात मोठी मोबाईल नेटवर्क ऑपरेटर कंपनी बनली

आजच्या बदलत्या युगात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे.तुम्ही ChatGPT चे नाव ऐकलंच असेल 30 नोव्हेंबर 2022 ला OpenAI कंपनीने ChatGPT ला ऑफिशियली लाँच केलं.या तंत्रज्ञाणामुळे कित्येक उद्योगपती याकडे आकर्षित झाले व tech कंपन्यांनीही AI Tools बनवण्यास सुरुवात केली.

ChatGPT काय आहे ?

ChatGPT
ChatGPT Logo

ChatGPT हा एक कम्प्युटर प्रोग्राम आहे जो टेक्स्ट मेसेजच्या माध्यमाने वर्चुअल गाईड प्रमाणे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो एक वर्चुअल असिस्टंट प्रमाणे तो तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामांमध्ये मदत करू शकतो.

ChatGPT नंतर AI टेक्नॉलॉजी मध्ये काय काय बदल झाले ?

OpenAI कंपनीने ChatGPT नंतर Dall E ( जे एक टेक्स्ट टू आर्ट ए आय टूल आहे.)लॉन्च केले व इंटरनेटवर त्यानंतर खूप सारे AI टूल्स येण्यास सुरुवात झाली काही दिवसांपूर्वीच OpenAI ने Sora ची अनाउन्समेंट केली सोरा हे एक टूल आहे ज्याद्वारे आपण आपल्या कल्पनाशक्तीला व्हिडिओमध्ये उतरवु शकतो. यामुळे चित्रपटसृष्टी मध्ये खूप मोठा बदल बघायला मिळू शकतो. याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे अमेरिकन फिल्म मेकर Tyler Perry यांनी Sora AI च्या अनाउन्समेंट नंतर त्यांचा 800 मिलियन डॉलरचा फिल्म स्टुडिओ बनवण्याचा प्लॅन रद्द केला.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे महत्व लक्षात घेता मुकेश अंबानी यांनी भारत जीपीटीच्या माध्यमातून AI क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले.

काय आहे BharatGPT ?

Bharatgpt
BharatGPT logo

BharatGPT हे ChatGPT सारखेच AI टूल आहे हे टुल बनवण्यासाठी रिलायन्स जिओ व भारतातील 9 IIT संस्था कार्यरत आहेत. या टूल मध्ये सुरुवातीला 11 भारतीय भाषांचा समावेश केला जाणार आहे. हे AI Tool ChatGPT ला टक्कर देण्यायोग्य बनले तर नक्कीच मोटाभाईंचा बिजनेस पोर्टफोलिओ हा मजबूत होणार आहे. हे AI tool 2024 मध्येच येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment