Stock market crash live updates : 4 जून 2024 आज बाजारावर निवडणुकीच्या निकालाचा परिणाम बघायला मिळाला. चार वर्षाच्या बाजाराच्या इतिहासात एकाच दिवसातील ही सर्वात मोठी गिरावट आहे. बीएसई सेंसेक्स आणि निफ्टी 50 यामध्ये जवळजवळ सहा टक्के डाऊनफॉल झाला.
बाजाराची स्थिती काय ?
Top gainers मध्ये Hindustan Unilevers,Britannia,Nestleindia,Heromotocorp,Tataconsumer Product यांचा समावेश आहे.
तर top losers मध्ये सर्वात जास्त गिरावट Adaniports 21.40% ,Adani Enterprises 19.07% , तसेच ONGC,NTPC,Coal india या सरकारी कंपन्यांमध्ये मोठी गिरावट पाहण्यास मिळाली.
बाजार कोसळण्याचे कारण ?
बाजार कोसळण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्याप्रमाणे निवडणुकीच्या निकालाचा अंदाज राजनीतिक विश्लेषकांद्वारे एक्झिट पोल्स मध्ये वर्तवण्यात आला होता, त्याप्रमाणे निकालाची दिशा राहिली नाही. इंडिया अलायन्स ने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली.
सोमवारी बाजार बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी-फिफ्टी आपल्या लाईफ टाईम उंचीवर पोहोचला होता. पण आज बाजारामध्ये 8% पेक्षाही जास्त गिरावट बघण्यास मिळाली नंतर बाजार थोडासा रिकव्हर होऊन ही गिरावट सहा टक्क्यांपर्यंत राहिली.
राजनीतिक विश्लेषकांचे मत काय ?
राजनीतिक विश्लेषकांचे असे मत आहे की बीजेपी गव्हर्मेंट मध्ये सर्वात जास्त फंडिंग हे विकासासाठी केले जाते तर काँग्रेस लीडिंग गव्हर्मेंट चा कल सोशल वेल्फेअर स्कीम्स वर जास्त असतो व ज्याप्रमाणे राहुल गांधींनी निवडणूक लढवताना रोजगार, गरिबी हे मुद्दे उठवुन यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स चालवण्याचा निर्णय घेतला, या गोष्टींचा परिणाम बाजारावर दिसून आला.
राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय म्हणाले ?
जनतेला ही माहीत आहे की नरेंद्र मोदींचा डायरेक्ट संबंध हा अडाणींसोबत आहे त्यामुळे आज सर्वात जास्त शेअर जर कोसळले असतील तर ते अडाणींचे आहेत.