बलत्कार् आरोपी प्रज्वल रेवन्ना याची 44000 मतांनी हार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Prajwal Revanna loses hassan seat

महिला सन्मान हाच समाजाच्या प्रगतीचा मापदंड ठरतो. पण काय होईल जर राजनीती मधल्या व्यक्तीनेच महिलांचे शोषण केले तर. ही परिस्थिती लोकशाहीसाठी हानिकारक आहे.

प्रज्वल रेवन्ना चे राजनितीक जीवन

Prajwal Revanna बंगलोर इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅजुएट झाला. तो 2014 ला राजनीति मध्ये सक्रिय झाला. तो पूर्व प्रधानमंत्री एचडी देवेगोवडा चा नातू आहे. 2015 मध्ये प्रज्वल रेवन्ना  भारताच्या दहा सर्वात युवा महत्त्वकांक्षी राजनेत्यांमध्ये शामिल होती.

2019 मध्ये देवी गोवडा यांनी प्रज्वल यस हसन येथून लोकसभेच्या निवडणुकीस लढण्यास अनुमती दिली आणि बीजेपी उमेदवार ए मंजू यांना हरवून आपली पार्टी JDS (जनता दल सेक्युलर) च्या सहा उमेदवारांपैकी एक मात्र विजेता बनला.

prajwal revanna यावर यौन शोषणाचे आरोप.

प्रज्वलने 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा हसन मधून निवडणूक लढवली. मतदानाच्या दिवशी मतदान एजंट ने पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली की हसन जिल्ह्यामध्ये प्रज्वल चे काही फोटो आणी व्हिडिओ वायरल केले जात आहेत. ज्यामध्ये काही व्हिडिओ सार्वजनिक ठिकाणी आढळलेल्या पेनड्राईव्ह मधून सापडले.

यानंतर 27 एप्रिल ला कर्नाटक सरकारने SIT (एक विशेष पडताळणी समिती) द्वारा पडताळणी केली. 28 एप्रिल ला Prajwal Revanna विरुध्द तक्रार नोंदवली गेली. कर्नाटक आयोगाने सांगितले की त्याने स्त्रियांना मजबूर करून त्यांच्या समतीशिवाय व्हिडिओ क्लिप्स बनवल्या आणी 2500 पेक्षा जास्त व्हिडिओ क्लिप्स त्याच्या सांगण्यावरून पसरवण्यात आल्या. जेवा त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली गेली तेव्हा Prajwal revanna आपल्या राजनायिक पासपोर्ट चा वापर करून जर्मनी मध्ये पळून गेला. ज्यासाठी विजा ची आवश्यकता नाही. 

30 एप्रिल ला प्रज्वल ला पार्टीने निलंबित केले. 31 मे ला प्रज्वल ला बेंगलोर एअरपोर्ट वरून पकडण्यात आले. सध्या प्रज्वल SIT च्या ताब्यात आहे 

पंतप्रधान मोदी यांना प्रज्वलच्या प्रचारावरून खूप ट्रॉल करण्यात आले.

यावेळी प्रज्वल चा प्रचार करण्यासाठी थेट नरेंद्र मोदी मैदानात उतरले. एरवी महिला सशक्तिकारणावर भाष्य करणारे पंतप्रधान एका बलात्काराच्या आरोपीस निवडणूक लढवण्यास मदत करताना दिसले. यावर विरोधी पक्षाने त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. सोशल मीडियावर ही त्यांना जनतेच्या टिकेचा सामना करावा लागला. याचा परिणामही हसन जिल्यामध्ये दिसून आला.प्रज्वलचे चे आजोबा हे 5 वेळा या जिल्यातून निवडून आले होते व आपल्या नातवासाठी त्यांनी ही सीट सोडली. पण जनतेला हे मान्य नव्हते व प्रज्वल ला 44000 मतांनी हार स्वीकारावी लागली. तर काँग्रेस चे M  shreyas हे निवडून आले. आता प्रज्वल चे संकट अजूनच वाढले आहे.

Leave a Comment