Joker 2 Trailer out

जोकर 2 या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज | Joker 2 trailer out

2019 मध्ये आलेल्या जोकर या चित्रपटाच्या यशानंतर चाहते त्याच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Joaquin Phoenix हा अभिनेता Joker आणि Lady Gaga ही अभिनेत्री Harley quinn च्या भूमिकेत दिसणार आहे हा चित्रपट एक रोमांचकारी आणि रहस्यमय राईड असल्याचे सांगण्यात येत आहे

Joker: Folie a diux
Joker 2 trailer

हा चित्रपट Todd Phillips यांनी दिग्दर्शित केला आहे ज्यांनी प्रिक्वल देखील दिग्दर्शित केला होता, आणि Phillips यांनी Scott Silver सोबत लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती Warner Bros Pictures आणि DC Studios यांनी केली आहे. या चित्रपटामध्ये Brendan Gleeson, Catherine Keener, Jacob Lofland आणि Harry Lotte देखील अज्ञात भूमिकांमध्ये आहेत.

Joker: Folie a Diux ट्रेलर ची सुरुवात Arkham Asylum येथे होते. जिथे जोकर हार्ले क्वीन ला भेजते. आणि तिथून सुरुवात होते त्यांच्या वेडसर प्रवासाची ज्यामध्ये ते एकत्र Gotham City मध्ये गोंधळ घालतात.

ट्रेलर मधील सर्वात मनमोहक दृश्यांपैकी एक म्हणजे हार्ले क्वीन आणि जोकर चा डान्स.

ट्रेलर आशादायक दिसत आहे आणि चाहते चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत कारण तो रोमांचक आणि रहस्यमय असल्याचे चित्रपट निर्माते सांगत आहेत. चित्रपटात संगीतही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे

2019 मधल्या जोकरला विविध अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले. Joaquin Phoenix ने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर जिंकला तर Hildur Guonadottir ला चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट मूळ स्कोर चा पुरस्कार मिळाला.

हा चित्रपट ऑक्टोबर 2024 मध्ये रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment