तुम्हाला आंबेडकराविषयी या गोष्टी माहित आहेत का

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

Ambedkar Jayanti 2024

डॉ बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषाला लहानापासुन ते थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येक जण ओळखतो.त्यांचा जन्म, त्यांचं शिक्षण,त्यांच कार्य, व त्यांच देशाबद्दलच योगदान याबद्दल सर्वांनाच थोडक्यात माहित आहे.पण आज Ambedkar Jayanti 2024 या निमित्ताने या लेखामध्ये आपण त्यांच्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

1.Education of Ambedkar ( आंबेडकरांचे शिक्षण )

सन 1907 मध्ये आंबेडकर मुंबईच्या Elphinston Highschool मधून मॅट्रिक (10th) च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.त्यावेळेस दलित समाजातून शिक्षण घेणे एवढे सोपे नव्हते.आणी त्यांच्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणे ही संघर्षाची पहिली पायरी होती.व इथून त्यांच्या जीवनातील संघर्षाचा खडतर प्रवास चालू झाला.नंतर आंबेडकरांनी higher education Elphinston College मधूनच घेतले

1912मध्ये त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. Bombay University मधून त्यांनी अर्थाशास्त्र आणी राज्यशास्त्र (Economics and Political Science) या विषयांमध्ये त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले.

नंतर सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने उच्चशिक्षणासाठी आंबेडकर अमेरिकेला गेले.व 1913 मध्ये Newyork शहरातील कोलंबिया विश्वविद्यापीठातून (Colambia University ) त्यांनी अर्थशास्त्रामध्ये M.A पूर्ण केले.त्यांची शिक्षणाची तहान अजून भागली नव्हती. 1916 मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठातूनच त्यांनी अर्थशास्त्रमध्ये (Economics) P. H. D मिळवली.

Ambedkar Jayanti 2024
कोलंबिया विद्यापीठ

अमेरिकेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते लंडन ला गेले .आणी London School Of Economics मधून त्यांनी (Law) मध्ये P. H. D प्राप्त केली.व 1923 मध्ये Barrister -at – Law ची पदवी मिळवली.व नंतर ते मायदेशी परतले.

London School of Economics
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

2.Social work of Dr. Ambedkar| आंबेडकरांचे समाजकार्य.

1. Mahad Satyagrah 1927 ( महाडचा सत्याग्रह )

आंबेडकरांनी महाडमधील चवदार तळे बहुजणांसाठी खुले करून दिले. यापूर्वी या तळ्याचे पाणी पिण्यास दलित समाजास सवर्ण समाजाने बंदी घातली होती. या सत्याग्रहामुळे दलित समाजाच्या न्याय व हक्काच्या चळवळीस चालना मिळाली.

Mahad cha satyagrah
चवदार तळे (महाड)

2. Kalaram Temple सत्याग्रह – 1930 ( काळाराम मंदिर प्रवेश )

नाशिक मधीलकाळाराम मंदिरामध्ये प्रवेश करुन वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी परंपरांना आव्हान दिले व दलित समाजासाठी मंदिराचे दरवाजे खुले करून दिले.

Kalaram Temple nashik
काळाराम मंदिर (नाशिक)

3. Pune Pact Satyagrah ( पुणे करार )

तत्कालीन ब्रिटिश सरकारने योजिलेल्या गोलमेज परिषदांमध्ये आंबेडकरांनी जातीप्रथेमुळे दलितांवर होणारा अन्याय तसेच दलितांची दुर्दैवी अवस्था सगळ्यांसमोर मांडली. ब्रिटिशांनी आयोजित केलेल्या तीनही गोलमेज परिषदांमध्ये ते एकमेव भारतीय उपस्थित होते.

Poona Pact
पुणे करारानंतर आंबेडकर सहकार्यांसमवेत

आंबेडकराच्या गोलमेज परिषदातील विश्लेषणानंतर ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा जाहीर केळव दलितांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची घोषणा केली. गांधीजींना हे मान्य नव्हते कारण स्वतंत्र मतदार संघातून प्रतिनिधी व मतदार दोन्ही दलित असतात, तर आरक्षित मतदार संघातून मतदारांमध्ये सवर्ण व दलित अशा दोन्ही वर्गांचा समावेश असतो. प्रतिनिधी मात्र केवळ दलित राहतात.

गांधीजींचे असे मत होते की स्वतंत्र मतदार संघ दिल्यानंतर हिंदू धर्मामध्ये फुट पडेल. त्यामुळे गांधी याविरोधात उपोषणास बसले.परंतु आंबेडकरांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी कायम ठेवली. हे दृश्य खूपच अनोखे होते. नुकतीच चाळीशी ओलांडलेला एक बुद्धिमान दलित युवक सुप्रतिष्टीत वृद्ध नेत्याला आव्हान देत होता. साहजिकच संपूर्ण भारतात आंबेडकरांच्या विरोधात रान पेटले. गांधीजींची प्रकृती बिघडत चालली होती.

त्यामुळे आंबेडकरांसमोर आरक्षित मतदार संघाचा पर्याय ठेवण्यात आला व 71 जगणऐवजी 148 जागा दलितांसाठी राखीव ठेवण्याचे आश्वासन दिले. नाईलाजाने त्यांना हा पर्याय मान्य करून पुणे करारावर सही करावी लागली, व गांधीजींनी उपोषण सोडले.

4. Manusmriti Dahan ( मनुस्मृती दहन )

चातुर्वर्ण व्यवस्था ही मनुस्मृती ग्रंथातून अस्तित्वात आली होती. या ग्रंथामुळे दलित समाजासह महिलांच्या हक्कावर गदा आली होती. त्यामुळे आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला या ग्रंथाचे दहन करून चतुर्वर्ण्य व्यवस्थेला आळा बसवण्यासाठी  सुरुवात केली.

manusmriti दहन
मनुस्मृती दहन

यानंतरही आंबेडकरांनी सामाजिक कार्य चालूच ठेवले. कामगार वर्ग, महिलांचे हक्क, मागासलेले वर्ग,यांच्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे समाजकार्य एवढे मोठे आहे की त्यासाठी ग्रंथही अपुरे पडतील. या एका लेखामध्ये त्यांचे कार्य उतरवीने अशक्य आहे, त्यामुळे याग फक्त महत्वाच्या घडामोडींचा उल्लेख केला आहे.

3.His Contribution Towards Nation ( आंबेडकरांनी देशासाठी काय केले ?)

मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. या प्रश्नाऐवजी एक वाक्य पुरेसं आहे, ते म्हणजे “आंबेडकरांनी देशासाठी सर्वकाही केले “. होय कारण आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत अस्पृश्यता, अन्याय, अस्वातंत्र्य या गोष्टीचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी या सर्वांवर मात केली व प्रत्येक भारतीयाला स्वतंत्रपूर्ण जगता यावं, कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी जगातील सर्वात मोठ्या संविधानाची निर्मिती केली.

इंग्रजांनी भारतावर फक्त 150 वर्ष राज्य केल. भारत हा इंग्रजांच्या गुलामगिरीत फक्त 150 वर्ष राहिला.परंतु मागासलेले वर्ग हे उच्चवर्णियांच्या गुलामगिरीत 2500 वर्षांपेक्षाही जास्त काळ राहिला आणी त्या मागासलेल्या वर्गांमध्ये फक्त दलोत समाजाच नाही तर इतर बहुजन समाज ही होता ज्यामध्ये कोळी,माळी,चांभार,लोहार,न्हावी,लोहार यांसारख्या असंख्य जाती होत्या. त्यांना त्यांचे काम निवडण्यास ही स्वातंत्र्य नव्हते. पिढ्यानंपिढ्या जे काम ज्या समाजास नेमून दिले आहे तेच काम नाईलाजाने करावे लागत होते. तसेच महिलांनाही कुठल्याच गोष्टीत स्वातंत्र्य नव्हते.

संविधानाद्वारे आंबेडकरांनी त्यांना हजारो वर्षांच्या बंधनातून मुक्त केले. 2500 वर्षानंतर पहिल्यांदाच आंबेडकरांनी स्वईच्छित कामं निवडण्यास स्वातंत्र्य दिले. मतदानाचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षणाचा अधिकार असे कितीतरी अधिकार त्यांनी संविधानाद्वारे बहाल केले.

Indian Constitution
भारतीय संविधान

यापूर्वी तब्बल 2500 वर्ष ब्राम्हणास शिक्षणामध्ये 100% आरक्षण होते,वैश्य समाजास व्यापारामध्ये 100% आरक्षण होते. ही आरक्षणाची पद्धत बाबासाहेबांनी संविधानाद्वारे बदलून टाकली व पहिल्यांदाच मागासलेल्या वर्गाला आरक्षण देण्यात आले. ( यापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी मागासेल्याना आरक्षण देण्यास सुरुवात केली होती.) परंतु संविधानाद्वारे आंबेडकरांनी मागासलेल्यांच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब केले व असे आरक्षण दिले जे पिढ्यानंपिढ्या टिकणार होते.

आंबेडकरांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत ही खूप मोठे योगदान आहे. The Problems Of The Rupee: या त्यांच्या ग्रंथाला Reserve Bank Of India च्या स्थापनेचा पाया मानला जातो.तसेच त्यांनी Lower income group वरील इनकम टॅक्स चा विरोध केला. याचेच प्रतिबिंब आज आपल्याला Indian income tax system मध्ये पाहण्यास मिळते. आजही income टॅक्स चे ओझे फक्त मोठी रक्कम कमावणाऱ्या खिशांवरच आहे. ही आंबेडकरांचिच गरीब जनतेला देण आहे.

Indian Constitution
द प्रॉब्लेम ऑफ द रुपी

4. आंबेडकरांना महामानव, परमपूज्य, क्रांतिसूर्य,विश्वरत्न अशा विविध उपमांनी का संबोधले जाते ?

ज्या समाजाला हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित ठेवले त्याच समजात् जन्म घेऊन जगातील सर्वात विद्वान व्यक्ती होणे हे एक सामान्य नाही तर हे एक महामानावच करू शकतो.एवढेच नाही तर जगातील नामवंत विद्यापीठांमधून तीन तीन विषयांत P.H.D मिळवणारे ते पाहिले भारतीय होते.

परदेशात शिकत असताना तिथे त्यांना भारतासारखी अस्पृश्यता जाणवली नाही.त्यांच्यासोबत इतरांचा व्यवहार खूप प्रेमळ होता. परदेशामध्ये त्यांच्या ज्ञानाला लोक किंमत देत होते. त्यांना आदराने वागवत होते. याउलट भारतामध्ये त्यांचा वेळोवेळी अपमान व्हायचा. ते एवढे मोठे विद्वान असून सुद्धा त्यांचा भारतामध्ये अशा लोकांकडून अवमान व्हायचा ज्या लोकांची त्यांच्या सोबत बसण्याचीही लायकी नव्हती. आंबेडकरांनी जर ठरवले असते तर ते परदेशातही settle होऊ शकले असते आपल्या कुटुंबासमवेत.त्यांना परदेशात कामाच्या,व्यवसायाच्या कितीतरी ऑफर्स आल्या होत्या. परंतु आंबेडकरांनी स्वतःचा स्वार्थ दूर सारला व भारतात परतले. व बहुजनांच्या हितासाठी आयुष्यभर लढत राहिले. 

ते समाजाच्या उद्धारामध्ये एवढे गुंतले होते कि त्यांचे आपल्या कुटुंबाकडे ही लक्ष राहिले नाही.त्यांनी आपल्या कुटुंबासाठी कधीच वेळ दिला नाही. त्यांची स्वतःची लहान लहान मुलं उपचाराविना त्यांच्या डोळ्यादेखत मृत पावली.पण तरीही त्यांनी दुःखाच्या ओघामध्ये आपल्या कार्यकड दुर्लक्ष केले नाही. त्यांचा लाडका राजवीर मृत पावल्यानंतर आंबेडकर म्हणतात. ” माझा एक राजवीर गेला, पण यापुढे माझ्या समाजात जन्म घेणारे लाखो राजवीर सुटाबुटात फिरतील.” त्यांच्यासाठी मला काम करायचे आहे. अशा या महामानवास कोटी कोटी नमन.

त्यांनी एवढे वर्ष संघर्ष करूनही जेव्हा त्यांना हिंदू धर्मामध्ये बदल जाणवला नाही तेंव्हा त्यांनी घोषणा केली की, ” मी हिंदू म्हणून जन्माला आलो, याला मी काही करू शकत नाही.पण मी हिंदू म्हणून मरणार नाही”. आणी शेवटी त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धर्म स्वीकारला.

येवला भाषण
मी हिंदू म्हणून जन्मलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही

आणी या गोष्टीला दोनही महिने पूर्ण झाले नाही तोवर त्यांची प्राणज्योत विझली. तो दिवस होता 6 डिसेंबर 1956. शेवटी एवढेच सांगेन ज्यांनी चंदनाच्या चितेवर भीम पाहिला त्यांनी कोटी कोटी अश्रूंचा पूर वाहिला त्यांनी कोटी कोटी अश्रूंचा  पुर वाहिला. 

पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा !

Source:- https://www.wikipedia. org

Leave a Comment