Jitendra Awhad Manusmriti dahan latest news
मनुस्मृती(Manusmruti dahan)वरून राज्यातील वातावरण तापले.
शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीतील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्या संदर्भात आक्षेप आणि सूचनाही मागविण्यात आल्या होत्या.
या निर्णयाचा निषेध म्हणून शरद पवार गटाचे नेते Jitendra Awhad महाड येथे 29 मे 2024 रोजी मनुस्मृतीचे दहन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
त्यादरम्यान माध्यमांसमोर त्यांनी पोस्टर फाडले यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनुस्मृती दहन करत असतानाचा फोटो होता.या घटनेमुळे जितेंद्र आव्हाडांवर राज्यभरातून टीका होत आहे. झालेल्या प्रकाराबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले:-
मनुस्मृतीचे पुस्तक फाडले जात असताना अनावधानाने त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेला हि आमची अक्षम्य चुकी आहे त्यामुळे मी या घटनेबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची लिन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो.
आव्हाडांकडुन नको ते घडलं –
शरीरातील मनुस्मृति घालवण्याचा प्रयत्न आहे मनातून मनुस्मृति गेली आहे का? हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे.
– वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर
मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याची आव्हाडांची चुकी अक्षम्य आहे.
– रामदास आठवले